Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Romance Classics Fantasy

3  

Pandit Warade

Romance Classics Fantasy

पहिल्या पावसाची लावणी

पहिल्या पावसाची लावणी

1 min
187


अहो यावं यावं सख्या साजणा, मनमोहना ।।

आला पाऊस पहिला, मिठीत मज घ्याना ।।धृ।।


कशी मदन ज्वराने वसुंधरा तापते ।

विरहिणी वाट त्या वरूणाची पाहते ।

प्रतिक्षेत तयाच्या दुःख किती साहते ।

तुम्हाविना जीव घाबरा उभारी मज द्याना ।।१।।


इष्काची इंगळी, कधी कशी चावली ।

होता मदनबाधा ज्वानी अंगी दाटली ।

चोळी जरीकाठाची दंडावरी फाटली ।

अशा वेळी दूर का? जवळ जरा यांना ।।२।।


येता गंध मातीचा उंडारली ती हरिणी ।

मन पतंग होऊन, फिरु लागे नभांगणी ।

नभी चोरून बघते शुक्राची ती चांदणी ।

गोडी यौन रसाची चाखून जरा बघाना ।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance