STORYMIRROR

Sunita Ghule

Romance

3  

Sunita Ghule

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
600


पहिले प्रेम



पहिल्या प्रेमाची अनोखी कहाणी

तु व्हावे राजा मी तुझी राणी


नजरबाणांची जय्यत लढाई

युद्धात गोड हारजीत नाही।


नेत्रकटाक्षांनी घायाळ करणे

व्याकूळ क्षणात आठवत जाणे।


भेटीच्या वेळेला साराच गोंधळ

कुणीच बोलेना दोघेही वेंधळं।


खूण हृदयाची हृदया पटली

बोलणे न काही तरीही गटली।


वाढल्या भेटी नि जुळली मने

हूरहूर रातदिन डोळ्यात जागणे।


गुणदोष स्विकारून घेतले सख्याचे

शुभ मंगल घडले यशस्वी प्रेमाचे।


सहजीवनी पाऊली मऊ हिरवळ

सख्याच्या प्रितीचा पसरे दरवळ।


फलद्रुप झाल्या मनीच्या सर्व आशा

जपते पदोपदी सुखाची भाग्यरेषा।



सौ सुनिता घुले

अहमदनगर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance