पहिलं प्रेम विसरता येतं.
पहिलं प्रेम विसरता येतं.
कॉलेजमध्ये असताना जेव्हा
पहिल्यांदा तुला मी पाहिलं होतं
काय सांगू आकाशातल्या चांदणीला
मी खुद्द जमिनीवर अनुभवलं होत
बट ढळलेली डाव्या डोळी
चेहऱ्यावरती सतेज कांती
ओठांवरती तीळ साजेसा
खळी शोभावी गोऱ्या गाली
सारखे सारखे मनी तुजबद्दल
मला वाटत होते आकर्षण
मन प्रेमरंगी न्हाऊन जायचे
जेव्हा व्हायचे तुझे मुखदर्शन
तूही मला पसंद करतेस
हे जेव्हा मला कळलं होतं
प्रेमात पडलेले हृदय वेडे
तुझ्यावरच भाळलं होतं
लावण्याची खाण जणू तू
जशी चांदणी असावी शुक्राची
नाव येता ओठी माझे
गालातल्या गाली हसायची
गोल टपोऱ्या डोळ्यांमधूनी
इशाऱ्यांचे ते बाण सुटले
शृंगाराने सजले रूप
प्रेमरंगी न्हाऊन गेले
दोघांनीही प्रेमाची कबुली दिली
सारे वाटू लागले नवे
दोघांच्याही हृदयात उडू लागले
प्रेमपाखरांचे ते थवे
पण मध्येच काही घडले असे
मला काहीच कळले नाही
अबोला का धरलास माझ्याशी
मला काहीच उमगले नाही
नेहमी नेहमी ते भेटणेही तुझे
मग काही दिवसांनी विरळ झाले
जुने सारे क्षण आठवून
मग असेच दिवस सरून गेले
आपल्यातलं नातं संपून गेलं
मग हेही मी मान्य केलं
तुझ्या सार्या आठवणी विसरून
मग पुन्हा एकदा प्रेम केलं
काही स्वप्न असतात अशीच
जी लगेच विरुन जातात
आशा दाखवून क्षणिक
चटकन निघून जातात
पण मीही तेव्हा तुटलो नाही
खंबीरपणे उभा राहिलो
तुझ्या आठवणी विसरून सार्या
पुन्हा एकदा प्रेमात पडलो
पुन्हा नव्याने सुरुवात केली
पुन्हा एकदा प्रेम केलं
नव्या माणसाच्या येण्याने मग
सारे काही छान झालं
पहिले प्रेम विसरता येतं
जेव्हा प्रेमळ माणूस भेटतो
पुन्हा एकदा नव्या नात्याची
नवी अशी सुरुवात करतो
आजही त्या नव्या प्रेमाशी
नेहमीच दोघे प्रामाणिक असतो
एकमेकांना वेळ देऊन मग
सारे जग विसरून बसतो
भूतकाळातल्या गोष्टी म्हणजे
अळवावरचं पाणी असतं
भूतकाळ सारा विसरून मग
वर्तमानाला जवळ करायचं असतं

