MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

4.6  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

पहिली माळ-राजमाता जिजाऊ

पहिली माळ-राजमाता जिजाऊ

1 min
614


अख्या जगाला ओळख असणारी

रणरागिनी राजमाता जिजाऊ 

तुझ्या धैर्याचे, तुझ्या धाडसाचे 

सांग किती गुणगाण गाऊ....!!


वीर पुरूषाची एकमेव माता

जिने घडविले राजे शिवछत्रपती 

स्वराच्याचे स्वप्न जिच्या कुशीतून निघाले

आऊसाहेबांचे लाडके छत्रपती...!!


ईतिहासाच्या पानोपानी रंगली

जिच्या अगाध शौर्याची गाथा

एक एक किल्ला हाती घेतला

पाचाडगडी टेकविते माथा....!!


शूरवीर लखुजीची कन्यारत्न तुम्ही 

अन्यायाचा केला हिमतीने सामना

तलवारबाजीत तरबेज झाल्या 

मनी स्वराज्याची होती कामना...!!


नवदुर्गा,महालक्ष्मीचे रूप सोज्वळ जणू

मोगलांना पळवून ठरल्या रणरागिनी 

घोड्यावर स्वार होवून दिसता 

भोसलेच्या ख-याखु-या वाघिणी.....!!


न्याय,नीतिमत्ता सोबतीला असे

गुलामीचे पाश तोडले

एक एक मराठा सरदार

नात्यात मग जोडले.....!!


स्वप्न तुमचे साकार करण्या

शूरवीर शिवबा घडविला 

शौर्याचे धाडसाचे शिक्षण देवून

आदर्श राजाने ईतिहास घडविला...!!


सह्याद्रीच्या कड्याकड्याला 

अजूनही आठवतो तुमचा ईतिहास 

प्रत्येक किल्ल्याच्या देतो साक्ष आजही

नका होवू देवू किल्ल्याचा-हास...!!


अन्याय, गुलामी, जुलमी राजवट 

नेस्तनाबूत करत मिळविले स्वराज्य 

महाराष्ट्र सारा ॠणात आपल्या

कसे टिकवीले आजचे महाराष्ट्र राज्य....!!


वीरमाता, राजमाता, राष्ट्रमाता 

तुलाच अर्पिते आजची पहीली माळ 

स्त्रीयांचा आदर तुच शिकवलास जगाला

कायमच ॠणी राहील मिनू बाळं....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational