पहिली भेट
पहिली भेट
आपुली पहिली भेट
आजही आठवते
ह्रदयात घुसते थेट
अन पुन्हा पुन्हा आठवणी जागवते
किती ओढ होती
फक्त एकमेकांची आस
कोणतीच तमा वाटत न्हवती
फक्त एकमेकांचा लागला होता ध्यास
सार काही अनपेक्षित होतं
दोघांना न्हवत कशाचं भान
काहीच मनाला कळत न्हवत
पण सर्व काही वाटत होतं छान
पहिली भेट ती आजही आठवते
सांजवेळी आठवणींचा थवा घेऊन येते
हृदयाच्या कोपऱ्यात विसावते
जाताना भावनांना हळुवार स्पर्श करून जाते...

