STORYMIRROR

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Romance

4  

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Romance

पहीली भेट

पहीली भेट

1 min
344

आठवते का सखे तुला आपली पहीली भेट..??

घुसला होता काळजात खोल नयनबाण थेट..!!

तुझं ते तेव्हाचं ऊशीराने बसस्टॉपवर पोहोचणं...,

ओढणीशी खेळत असताना घड्याळात बघणं..!!

आवडलं होत ना माझं तुझ्याकडे चोरून पाहणं..???


जसं मनावर अलगदच जणु मोरपिसाचं फिरणं..!!!

अचानकंच मग ते हवेच्या मंद झुळुकीचंही येणं...,

ओढणीने तुझ्या माझ्याच चेहऱ्यावर स्थिरावणं..!!

ओढणी घेत असताना आपली नजरानजर होणं...,


मनं वेडावणारचं तुझं ते मनमोहक लाजुन हसणं..!!

अनोळखी असूनही पुर्वजन्माची ओळख भासणं...,

आपल्या नजरांच हळुवारच नजरेत बंदिस्त होणं..!!

माझ्या पहील्या त्या अलवार स्पर्शाने तुझं धुंद होणं...,


भोवतालच्या जगाचा मग दोघांनाही विसरचं पडणं..!!

आपल्या या गडबड-गोंधळात बसचं निघुन जाणं...,

तुे तुझं माझ्याकडे उगाचचं लटक्या रागाने पाहणं..!!

माझंही ऊगाचं तुझ्याकडे डोळ्यांतुनच क्षमा मागणं..!!


मुश्कीलचं झाल होत ना ग तुला तुझं हसु आवरणं..??

ईतक्यात मग परत ते आपल्या पुढच्या बसच येणं...,

त्यावेळी दोघांनीही एकाच वेळेला बसमध्ये चढणं..!

माझ्यासह तुझंही शेवटच्या थांब्याचं तिकीट काढणं...,

हळुच माझ्या खांद्यावरती तुझं ते हक्काने विसावणं..!

आवडतं ना सखे तुला हे सगळं पुन्हा पुन्हा आठवणं..??

प्रेमांकुर आपल्या प्रीतीचा नव्यानेच मनात रूजवणं..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance