फडकला तिरंगा
फडकला तिरंगा
फडकला तिरंगा
देऊनिया बलिदान
चला वाढवूया सारे
आपल्या देशाची शान ||१||
रंग तीन तिरंग्याचे
सांगे महती देशाची
आपला देश असती
मूर्ती ही महानतेची ||२||
वार्याच्या झोताने पहा
फडके तिरंगा नभी
इतिहासाच्या पानाने
चळवळ होई उभी ||३||
सलाम करू आपण
मानाने या तिरंग्याला
देशासाठी झटलेल्या
वीरांच्या बलिदानाला ||४||
देशाचे प्रतीक आहे
तिरंगा असा मानाचा
जीवापेक्षाही प्रिय हा
तिरंगा असे देशाचा ||५||