Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mangala Rajput

Inspirational

3  

Mangala Rajput

Inspirational

फडकला तिरंगा देऊनिया बलिदान

फडकला तिरंगा देऊनिया बलिदान

1 min
278


स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिक, टिळक,

रानडे,आगरकर, सावरकर,

यांनी ठेविले तुळशीपत्र

आपल्या घरावर-१


भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव

यांनी दिले आपले प्राण

अशी गौरव गाथा स्वातंत्र्याची

जयघोष करूया जय जवान जय किसान-२


भारताचा तिरंगा आहे प्यारा

फडकला तिरंगा देऊनिया बलिदान

 आकाशात फडकतो उंच

अन् भारताची वाढवितो जगात शान-३


त्यागाचा रंग आहे केशरी

आठवण ठेवावी स्वातंत्र्यवीरांची

पांढरा रंग खूण पावित्र्याची

नैतिकता ठेवावी शुद्ध चारित्र्याची-४


हिरवा रंग आहे समृद्धीचा

ध्यास घ्यावा भारताच्या विकासाचा

भारतात आहे विविधता

संदेश देतो एकतेचा-५


देशभक्ती ठेवू ज्वलंत

सैनिकांना, क्रांतिकारकांना देऊ सन्मान 

अबाधित ठेवू स्वातंत्र्य, समता ,बंधुता

स्वातंत्र्याचा आहे आम्हा अभिमान-६


Rate this content
Log in