रक्षाबंधन
रक्षाबंधन

1 min

24
भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम
रक्षाबंधनाचा सण
करा रक्षण सर्व बहिणींचे
देतो इतिहासाचे स्मरण-१
येता श्रावण पौर्णिमा
आनंद होतो बहिणीला
आठवण येते भावाची
जाते ती माहेराला-२
कपाळी लावते टिळा
ओवाळीते बहिण-भावाला
धागा बांधते प्रेमाचा
दीर्घ आयुष्य इच्छिते त्याला-३
असो राखी कुठल्याही प्रकारची
असते प्रेमभावना महत्वाची
भावाला जाणीव करून देते
जबाबदारीच्या भावनेची-४
होवो उत्कर्ष भावाचा
राहू दे असाच गोडवा
प्रार्थना करते रक्षाबंधन निमित्ताने
असाच नातेसंबंध टिकावा-५