असे हे रंग जीवनाचे
असे हे रंग जीवनाचे
1 min
460
ना चिंता ना काळजी
बालपण असते सुखाचे
खा-प्या फक्त मजा करा
असे हे रंग जीवनाचे
स्फूर्ती, उत्साह, जोश
झोकून काम करायचे
तारुण्यात प्रेमाचा रंगच न्यारा
असे हे रंग जीवनाचे
जबाबदारी कर्तव्य पार पाडूनी
प्रौढ अवस्थेत असते कमवायचे
काहींचे फक्त पैसाच असते ध्येय असे हे रंग जीवनाचे
म्हातारपणी पैसा असूनदेखील
माणसं वाटतात अडगळीचे
असतात प्रेमाचे भुकेले
असे हे रंग जीवनाचे
कोणी असतात प्रामाणिक
तर काही घातकी स्वभावाचे
काही बनतात रंक तर काही राव
असे हे रंग जीवनाचे
पतंगाप्रमाणे असते जीवन
क्षणात वरचे क्षणात खालचे
नसते आपल्या हातात
असे हे रंग जीवनाचे