गणपती बाप्पा
गणपती बाप्पा


काल माझ्या स्वप्नात
गणपती बाप्पा आले
त्यांना मी म्हणाले-
यावर्षी बाप्पा कोरोनामुळे
तुमचे आम्ही वाजत गाजत
स्वागत करू शकणार नाही
बाप्पा म्हणाले, हरकत नाही
धर्म, जात-पात गरीब-श्रीमंत
भेद मिटला, समानता आली
परोपकाराचे महत्व कळले
हेही काही कमी नाही
स्त्रियांच्या कष्टाची जाणीव झाली
प्रत्येकाची किंमत कळली
कुटुंबाचे महत्त्व कळलं
हेही काही कमी नाही
लोभ, मत्सर, क्रोध, भांडणे
योग्य नाही
नात्यांचे महत्त्व कळले
हेही काही कमी नाही
अहंकार नष्ट झाला
माणसाला माणसाची किंमत कळली
मानवता वाढली
हेही काही कमी नाही
कमी खर्चात जगू शकतो
समाधानी वृत्ती वाढली
जीवन किती अनमोल आहे हे कळले
हेही काही कमी नाही
कमी खर्चात लग्न होते
अनावश्यक खर्च टाळू शकतो
स्वच्छता पर्यावरणाचे महत्व कळले
हेही काही कमी नाही
डॉक्टर, नर्स,पोलीस
सफाई कामगार यांच्यातच
लोकांना देव दिसला
हेही काही कमी नाही
शेवटी बाप्पा म्हणाले,
तुमच्यात एवढे परिवर्तन झाल्यावर
मी भरून पावलो
हेही काही कमी नाही