ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
8
पक्षाला विचारा
किती ओढ पावसाची
त्याला नाही
तोड कशाची-१
बळीराजाला विचारावे
किती ओढ पावसाची
शेती ,उदरनिर्वाहासाठी
त्याला गरज असते पावसाची-२
मजुरांना विचारावे
किती ओढ पावसाची
शेतीवरच पोटे भरतात
शेतमजुरांची-३
पशुपालन कर्त्यांना विचारावे
किती ओढ पावसाची
गुरांच्या चाऱ्यासाठी ,व्यवसायासाठी
गरज असते पावसाची -४
पावसाविना करपते पिक ज्यांचे
गरज असते पाण्याच्या थेंबांची
त्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विचारावे
किती ओढ पावसाची-५
पाऊस येताच मोर नाचतो थुईथुई
शेतकऱ्यांनाही उकळी फुटते आनंदाची
सारी सृष्टीच फुलते ,होते नवलाई
त्या वेळेला वाटते किती महत्वाची ओढ पावसाची-६