Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Anju Metkar

Romance

2.5  

Anju Metkar

Romance

पहाट वारा

पहाट वारा

1 min
1.2K


ब्रह्ममुहूर्ताच्या निवांत वेळी

मावळतीचा चंद्र केशरी

पहाटवा-याची झुळूक नव्हाळी

शित गारवा शिरशिरी भरी ।।१।।


दवबिंदूंनी भिजले तरुवर

मिटले मुकुल खुलतात अलवार

दरवळ पसरे व्यापुनी सभोवार

उषःकालचा करून जागर ।।२।।


टपटप प्राजक्त सडा धरेवर

चुंबुनी घेतो अवनीस अनावर

नाजूक पाकळी नर्तनात चूर

सख्या प्रियाच्या मिलनात अधीर ।।३।।


अजूनी जाग नसे गोकुळी

राधा बावरी उन्मनी कळी

पैलतीरावर अशा अवेळी

अलगुजधुन घुमते निर्मळ ।।४।।


रिती पाशांचे भान झुगारून

लोकलज्जा भय तोडून

पंकजपद्म ठसे अवलोकून

धावे राधा यमुनातिरी असोसून ।।५।।


प्रिय सख्याच्या भेटीस्तव झुरते

अविरत नाम ओठी स्मरते

अमृतधूनीने भान हरपते

कृष्णसंजीवनीत एकरूप होते ।।६।।


Rate this content
Log in