पैशासाठी
पैशासाठी
पैशासाठी जगणे
म्हणजे आयुष्य नसते
आपल्यांसाठी जगणे
म्हणजे आयुष्य असते
इतरांसारखे सुख नसले म्हणून
पैसा मिळवण्यासाठी
कशाला धावायचं
वैभव दुसऱ्याचं पाहून
स्वतःला का जाळून घ्यायचं
प्रामाणिक राहणे अवघड असले तरी
बेईमान कधीच व्हायचं नाही
पैशासाठी मात्र वाट चुकवायची नाही
मौजमजेसाठी घर सोडून
जग बघणारे
आपल्या अवतीभवती खूप असतात
कर्जबाजारी होऊन
सुंदर आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतात
अरे कितीही कमवले तरी
मेल्यावर सोबत काहीच नेत नाही
आणि राहिले किती गेले किती
काही स्वर्गातून दिसत नाही
तेव्हा.....
बिनकामाची चिंता करण्यापेक्षा
जे आहे त्यातच समाधान
समजायचं
आणि क्षणभर आयुष्य मस्तपैकी
म.... न.... भ.... र....
जगून घ्यायचं
