STORYMIRROR

Vijay Kadu

Tragedy

3  

Vijay Kadu

Tragedy

पैसा हाच देव

पैसा हाच देव

1 min
246

नातीगोती सारी खोटी

पैसा हाच इथं देेव

स्वार्थासाठी नाती जोडती

काय रंक काय राव

प्रेम माया सर्व खोटं

इथं पैसा भरतो पोटं

रक्ताचीही नाती इथं

होतात डोई जड माठं

देवाशीही नाती जोडती 

होण्यास बघ फलश्रृती

स्वार्थासाठी इथं कापती 

आपलीच रे नातिगोती

सारेच लोभी स्वार्थी 

पैसा हाच इथं देव

कुणी कुणाचा नसे

इथं पैशालाच भाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy