STORYMIRROR

Sarika Jinturkar

Romance Fantasy

3  

Sarika Jinturkar

Romance Fantasy

पावसाची सर

पावसाची सर

1 min
160

रिमझिम पावसाची सर

 आज आली  

मनात दडवून ठेवलेल्या आठवणींचा भाग झाली  


सारेच क्षण ओले 

झाले पावसाच्या सरीत

ठोठावला मनाचा दरवाजा हलकाच तू तुझ्या भासाने स्वप्नांना बघ आज जाग आली  


भिजली मग मी ही चिंब 

बेधुंद होत गिरक्या घेत रे सख्या 

जणू त्या फुगडीतली 

मल्हार राग झाली 

पारिजातकाला आनंद झाला 

वारा ही मंदधुंद वाहला 

लाज लाजऱ्या जुई वेलींची फुलबाग

 ही आज अधिक प्रफुल्लित झाली  


तृप्त झाली धरा पावसाची सर ही धरेवर विसावली 

झाडे- वेली पशुपक्ष्यांसह सारीच आज रे सुखावली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance