STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Romance

2  

Anjali Bhalshankar

Romance

पावसाचे थेंब

पावसाचे थेंब

1 min
116

पावसाचे थेंब पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर अलगद कोसळतात तेव्हा ते मला माझ्या बालपणात घेऊन गेलेले असतात

सरत्या वयाने नीसटून गेलेलं माझं निरागस बालपण काही क्षण का होईना ते मला परत देतात

स्वप्नांच्या मागे धावताना पायांनी सोसलेल्या चटकन वर प्रेमाचे तुषार हळुवार बरसवतात

पावसाचे थेंब कधी वय विसरायला लावतात कित्येक वर्ष मागे नेऊन ऊनाडपणे बागडायला लावतात

आयुष्याच्या मध्यावरून बालपणात तर कधी उमलत्या तारुण्यात नेतात मनाच्या कप्प्यात खोलवर दडून ठेवलेल्या आठवणींना नव्याने जागवतात

डोळे भरून गहिवरून टाकतात कडाडणारया वीजा गडगडणारे ढग काळेकुट्ट आभाळ पाहून नकळत आईचा पदर शोधतात

पावसाचे थेंब डोक्यावरून केसांवरून ओघळून गालांवर येतात डोळ्यातल्या अश्रू मध्ये केव्हाच मिसळलेले असतात

 साऱ्या दुःखाचे मूळ निरस आयुष्याची मरगळ झटकून हेच थेंब मला पुन्हा नव्याने जगायला शिकून गेलेली असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance