पावसाचा नाद खुळा
पावसाचा नाद खुळा
काळया ढगांनी केली गर्दी
आभाळ आलं दाट भरून
मर्ज़ीचा मालक तू पाऊसराया
बरस आज तरी बेभान होऊन
वाटे सुखद हा ओलावा
संपू नये असे विलक्षण क्षण
भिजव माझी काया अन्
चिंब होऊ दे माझं वेडं मन
नकोस करू उशीर आता
किती बघावी सांग वाट तुझी
दरवळला मादक सुगंध मातीचा
वेळेचे ना राहिले भान ही
विसरुनी हे जग सारे
डोळे मिटले या कातरवेळी
झेलल्या काही अवखळ धारा
मोहक जाहली देहाची कळी
हो प्रत्येक क्षणाचा सारथी, पावसा
कायम राहो तुझा अनंत जिव्हाळा
खरंय का म्हणतात, जे सारे
पावसाचा अगं नादच खुळा...

