पाऊसातील दिवाळी
पाऊसातील दिवाळी
या वेळी पाऊस म्हणाला
मी परत नाही जाणार
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार
मी आल्यावर लोक करतात
नुसते उपास अन् तापास
कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास
वास घेऊन पदार्थांचा जेव्हा
होईल मी तृप्त
मगच ठरवलय मी
ह्या थंडीत होईल लुप्त
चातुर्मासातला फराळ म्हणजे
साबुदाणा अन् भगर
त्याला कशी येणार
दिवाळीच्या फराळाची सर
छत्री रेनकोट बघून बघून
मी ही कंटाळलोय
दिवाळीचे नविन कपडे
बघायला मी थांबलोय
म्हंटल होत आपणही कुर्रम कुरम चकली खाऊ
पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली मऊ
लाडू बसला फुगून
करंजी बसली गुरफटून
"अतिथी देवो भव"
सारेच कसे गेले विसरून
शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायचे
चकल्या नाही तर नाही
कांदाभज्यांवरच दिवाळी कराय
