STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Romance

3  

Kamlesh Sonkusale

Romance

पाऊस

पाऊस

1 min
14.7K


नेहमी माझा असावा

ओलाचिंब तो पाऊस,

हळूच ओठी वेचावा

गालावरचा टिपूस...


अधरांनाही न लागे

चुंबनाचा तो आभास,

अंतरी मग काहुर

बरसला तो पाऊस...


नखशिखांत भिजता

बावरला तो पाऊस,

मागावा आता नव्याने

प्रेमाचा क्षण कुणास ?


बरसुनी गेला आता

कधीचा वेडा पाऊस,

हुंकार देता तृप्तीचा

स्पर्शुनी तिच्या अंगास...


भिजलेले अंग तिचे

उधाण आले प्रितीस,

होऊन सरी नयनी

पुन्हा मागतो पाऊस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance