पाऊस..
पाऊस..
पाऊस माझ्याशी नेहमीचं असं वागला..
कीतीही जवळ केला तरीही,नेहमीच परका भासला ...
.
कितीतरी दिवसांनी आज पावसाच्या सरींचा खूप आनंद लुटला..
वाटलं पावसाशी जवळीक साधावी,
पण पुन्हा एकदा पाऊस मला अनोळखी वाटला..
आचानक कधीतरी एकदा ,
पावसात भिजण्याचा मोह झाला ..
खूप वाट पाहूनही पाऊस मात्र, नाहीच आला..
पावसाबद्दल विशेष अस,सांगण्यासारख नाही उरलच काही..
खरं सांगायच झाल तर,पाऊस मला कधी आवडलाच नाही..
