STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Romance Tragedy

4  

Rajiv Deshmukh

Romance Tragedy

पाऊस..........

पाऊस..........

1 min
195

बेभान बरसणारा पाऊस पाहुन मी विचार करतो,

माझं तर ठीक आहे, हा कुणासाठी रडतो !!


जर असेल तुला, श्रावणातल्या सरी पाहण्याची हौस,

तर डोळ्यात बघ माझ्या, तिथं दिसेल तुला पाऊस !!


आला पाऊस, गेला पाऊस, पण तू नाही आली,

वाट पाहुनी थकले डोळे, पापणी ओली झाली !!


रडतो मी पावसात, पण कुणालाच दिसत नाही,

अश्रू आणि आठवणी, याशिवाय उरलं नाही काही !!


पहिल्या भेटीच्या ठिकाणी, कधीतरी जाशील स्वताहून,

दिसेल तुला दगडावर माझ्या अश्रूंची खुण !!


विरह पाहून माझा, आसवांनी भरेल तुझी ओंजळी,

गेला पाऊस निघून, ऐकून माझी आरोळी !!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance