STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Others

3  

Rajiv Deshmukh

Others

एक निवांत क्षण...

एक निवांत क्षण...

1 min
429

आजही आठवतो तो, एक निवांत क्षण,

जिथं चोरलं होत तु माझं मन!!

जाऊन बसतो एकटाच त्या ठिकाणी,

तु नाही जवळ,पण आहेत तुझ्या आठवणी!!

नियतीला नव्हतं मान्य, आपलं येणं एकत्र,

दिवसाही पाहतो स्वप्न, समजून मी रात्र!!

का? गेलीस तू अर्ध्यावर सोडून,

काळजाचे माझ्या हजार तुकडे करून!!

आहेस तु खुष तुझ्या संसारात,

स्वतालाच बंदीस्त केले मी,माझ्याच घरात!!

अंधारमय कोठडीत, अंधारमय जीवन,

प्रकाशा ऐवजी येते, तुझ्या आशेचे किरण!!

वेळही पळत सुटला,जसे पळते हिरण,

आजही आठवतो तो एक निवांत क्षण,


Rate this content
Log in