STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Others

3  

Rajiv Deshmukh

Others

आरसा......

आरसा......

1 min
15

देहातील प्राण निघून जातील

श्वासावर भरोसा नाही......


काळजातील दुःख दाखवेल

असा आरसा नाही........


सुख केव्हाच निघून गेले

दुःखाने सोडला अजून वारसा नाही......


कधी आली अन् निघून गेली

पावलांचा तिच्या ठसा नाही......


दुःख दोघांचेही सारखेच

अश्रू दाटले डोळ्यात,

रडले ढसाढसा कोणीच नाही......


साहित्याला गुण द्या
लॉग इन