STORYMIRROR

Rajiv Deshmukh

Others

3  

Rajiv Deshmukh

Others

बाप हा बापच असतो

बाप हा बापच असतो

1 min
335

जेंव्हा बाप विचारतो लेकिला,तू येशील ना परतून,

तेंव्हा फुटतो घाम अंगाला, अश्रू वाहतात डोळ्यातुन !!

मायेचा हात फिरवत,फारसा बोलत नाही काही,

जगी आई पेक्षा कमी, कधीच त्याचं प्रेम नाही !!

बाप हा ऊन्हात सावली,अनं पावसात छत असतो,

लग्नाच्या वेळी तो, कोपऱ्यात रडतांना दिसतो !!

काळजाचा तुकडा जेंव्हा देतो दुसऱ्याच्या हाती,

मन जळते दिव्यासमान, त्यात नसतात वाती !!

वाटी लावतांना थकत नाही हात आशिर्वाद देऊन,

उलट्या पावलांनी परत फिरतो डोळ्यात पाणी घेऊन !!

बाप हा....बापच...असतो,

एकांतात रडतो, अनं आपल्या समोर हसतो !!


Rate this content
Log in