पाऊस
पाऊस
मनाला धुंद करत
पसरला मातीचा सुगंध
मनाला स्पर्श करत
आला पहिला पाऊस बेधुंद
पहिला पाऊस झेलून घ्या
नवे चैतन्य जागवू द्या
राग रुसवे सारे वाहून जाऊ द्या
नव्या उमेदीला मनी जागवू द्या
पहिल्या पावसाची मजा काही औरच
ती मजा अनुभवूया
या मातीच्या गंधात सारेच
धुंद बेधुंद होऊन जाऊया!

