STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Others

4  

Supriya Devkar

Romance Others

पाऊस

पाऊस

1 min
196

आभाळ भरून जातं 

काळ्या काळ्या ढगांनी

तुझी चाहुल मनाला 

भिजवून टाकते थेंबानी॥१॥


सैरावैरा धावतोस कधी 

कधी पाहतोस ढगाआडून 

नको नको रे पावसा 

असे जावूस एकटे सोडून॥२॥


साठवायचेत अनमोल क्षण 

सरींमध्ये भिजताना 

पहायचय माझ्या सखीला 

पाऊस झेलत लाजताना ॥३॥


थाबंशील ना थोडा 

माझ्या परसबागेत 

फुलांनी बहरलेल्या 

सप्तरंगी जागेत॥४॥


तुझा अवखळपणा 

मनाला समाधान देतो 

सृष्टीला सार्या 

 हिरवळीचे दान देतो ॥५॥


असाच घाल धिंगाणा 

भिजवून टाक धरनी 

आसुसलेल्या डोळ्यांना 

पाहू दे ही पर्वनी ॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance