पाऊस सरी...
पाऊस सरी...
पाऊस गारवा
ऋतू हिरवा...
छेडीत मारवा ..
गातो हा वारा
धुंद गुलाबी हवा
छंद बेधुंद मना
उठती तरंग नवा
बेभान करी तना....
थेंब अल्वार जीवा
झेलीत सर ती पुन्हा
वेड लावी मना
हा पाऊस गारवा ..
बेभान सुगंधी हवा
वाटे सतत नवा
हवासा साथ तुझा
अलगद येसी मना
घेसी कवेत या जला
झेलीत पाऊस धारा
क्षण सारे हे लाजरे
गोड करुया साजरे
ओली सर ती हसरी ..
होते बेभान ती बावरी
गंधाळुन होते कावरी
लाजुन चुर ती सावरी
येता या जलसरी ..
तरंग उठती मनी.

