STORYMIRROR

kajal dhage

Abstract

2  

kajal dhage

Abstract

पाऊस एक पिता

पाऊस एक पिता

1 min
123

धुंद चढत्या हवेत, 

दरवळणारा गंध, 

रिमझिम पाऊसात, 

वार्‍याची झुळूक मंद.


उगमाच काम याच, 

वातावरण सुंदर करण,

बरसण्याच कारण याच, 

बेभान मनाला धरण. 


सांगून जातात खुप,

ते कडाडले मेघ, 

जशी काय नृप, 

ती इंद्रधनुची रेघ. 


बदलात बदल करणे, 

याच सुंदर काम, 

ईतके ऋण करुन याण,

नाही घेतल कधी दाम. 


वाटत असत नेहमी,

तुला द्यावा तरी किती मान, 

तुझ्यामुळेच फूलल त्या,

शेतकरी राजाच राण.


शेतकऱ्याच लेकरू तुला,

म्हणण त्याच सांगतय, 

तुझ्या चार महिन्याच्या येण्यान,

वर्ष आमच चालतय. 


तुझा उगमच तर, 

त्या पेरणीचा उगम दाता,

तुझ्यामुळेच तर जगतोय आम्ही, 

तूच आहेस सर्वांचा पिता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract