STORYMIRROR

kajal dhage

Thriller Others

2  

kajal dhage

Thriller Others

स्व

स्व

1 min
85

कधी स्वतः मध्ये गुंफलेली, 

कधी स्वतः मध्ये जोडलेली, 

कधी स्वतः मध्ये हरवलेली, 

मी अशीच आहे बावरलेेली,


कधी मला सुंदर,

आठवतो एक सुविचार, 

वाटत यावा जीवनात सदाचार, 

पण वेगळाच घडतो माझा विचार, 


कधी वाटत मी आहे एक नृप, 

सुंदर आहे माझ रूप, 

पण कधी वाटत मी आहे एक कुरूप, 

वेगळच आहे माझ स्वरुप,


काटाकुटया तून बहरलेली, 

संकटातून सुटलेली, 

आठवणींना आठवलेली, 

मी अशीच स्वतः ला भेटलेली, 


आयुष्याला घडवण्याची इच्छा खरच आहे, 

जीवनामागे धडपडणारी कृती दांडगी आहे, 

भविष्याची कल्पनाच वेगळी आहे, 

पण करिअर शोधण्याची कलाच वेगळी आहे, 


मी स्वतः काय आहे, 

कुणाला माहित आहे, 

विचार केला तर एक तापलेला रवी, 

नाहीतर एक सुंदर कवी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller