करून जातो सर्वांची हाऊस...
करून जातो सर्वांची हाऊस...
1 min
83
गरम उन्हातून,
उगम सारा,
आता यातून,
येणार पाऊस धारा.
मेघ गर्जना,
कडाड वीज,
आता यातुन फुटणार,
नवीन बीज.
हा येतो,
चार महिन्यांचा पाहुणा,
आकार देतो,
शेतकर्यांच्या राणा.
वर्णन याच,
अपार आहे,
त्यात सोसाट्याचा,
वाराच आहे.
वाराच आहे,
याचा साथी,
करतो ओलीचिंब ,
सुंदर माती.
उगम याचा,
होतोय भारी,
वृक्ष वेली,
फुलले सारी.
ईतका हर्ष,
याला आवरेना,
त्यातून मोर,
सुद्धा सावरेना.
पाऊस मला वाटत,
आहे एक दाता .
मन जात भारावून,
इंद्रधनुष्य पाहता.
तुझ्या उगमाने,
फसवे मन झाले,
तू आलााा अन्,
हसली नदी नाले.
रिमझिम थेंबे,
खरच लाजली,
यातुन सारी,
सृष्टि सजली.
आपला एक,
साथी पाऊस,
करून जातो,
सर्वांची हाऊस.....
