पाऊस भेट
पाऊस भेट
थेट झाली भेट झाली पावसाने गार झाली
चिंब झाली थेंब झाली प्रेमवर्षा फार झाली
चुंबनांची लाल लाली पावसाने धुंद झाली
प्रेमयुद्धे छेडतांना चुंबने तलवार झाली
वीज कोठे का पडावी आग कोठे राख झाली
जीवनाला प्रीत तुझी साजणे आधार झाली
गुंफ माझे हात हाती पावसाला झेल साकी
छेडतांना गीत माझे पावसाची धार झाली
थेंब सारे पावसाचे या मिठीची साक्ष झाले
धुंद डोळे पाहतांना नेत्र माझे ठार झाली
गार होता पावसाळा गार होता स्पर्श वेडा
स्पर्शतांना अंगकांती वीज वेगे स्वार झाली

