STORYMIRROR

Sachin Mhetre

Romance

3  

Sachin Mhetre

Romance

पाऊस आला भिजवून तुजला

पाऊस आला भिजवून तुजला

1 min
271

पाऊस आला भिजवून तुजला 

केसांतुनी थेंब तनूवरी सरकला 

तुझीया गाली मोती थिजवीला

पाऊस आला भिजवून तुजला ।।धृ १।।


वसने ओली बिलगली देहाला 

मी ही वसन व्हावे वाटे मनाला 

लपेटून घेशील चिंब ओल्या तनूला 

पाऊस आला भिजवून तुजला ।।२।।


गोड अधरी थेंब एक विसावला 

वाटे धावूनी तो मी सावरावा 

तुझ्या उष्ण श्वासात श्वास माझा मिळावा 

पाऊस आला भिजवून तुजला ।।३।।


कटी भोवती हात हलकेच गुंफून 

अलगद जवळी तुज घ्यावे ओढून 

ओल्या सरीसवे बघ श्रावण आला 

पाऊस आला भिजवून तुजला ।।४।।  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance