प्रीती...
प्रीती...
सूर्य भेटण्या सखीस आतूर धावे क्षितिजापार
दिवसही मग कुशीत शिरे संध्येच्या हळुवार ।।१ धृ।।
मीलन होता लाली फुलते संध्येच्या गाली
आकाशी ते रंग उधळती कुंकूम केशर हळदी ।।२।।
वाराही मग धूंद होऊनी सुगंध घेई हाती
चंद्र तारका फुलून येती पुनवेच्या राती ।।३।।
ओढं जीवा ही तुझी लागली माझी जीवनसाथी
रातराणीसंगे बहरो तुझी नी माझी प्रीती ।।४।।
सूर्य भेटण्या सखीस आतूर धावे क्षितिजापार
दिवसही मग कुशीत शिरे संध्येच्या हळुवार ।।धृ।

