STORYMIRROR

Sachin Mhetre

Others

3  

Sachin Mhetre

Others

विसाव्याचा क्षण

विसाव्याचा क्षण

1 min
262

आला विसाव्याचा क्षण, झाले रिते रिते मन 

आठवले सोनेरी क्षण, वेचले सारे कण कण ।।धृ १।।


सारे मिळविण्या ध्यास, किती केला अट्टाहास 

नाही घेतला सुखे श्वास, आता सोडतो निश्वास ।।२।।


सारे माझे माझे खास, केले नाही कधी बास 

आता उरली ना आस, केला वाटे उगा हव्यास ।।३।।


गेले दिसा मागून दिस, किती मोहांचा मी दास 

आता तुटले सारे पाश, घेतो मोकळा मी श्वास ।।४।।


रवी चालला अस्तास, वातं लावतो निरंजनास 

आता मागणे हे खास, देवा नेई तुझ्या सदनास ।।५।।


Rate this content
Log in