सहजीवन : वड - पिंपळ
सहजीवन : वड - पिंपळ
1 min
268
वडाच्या माथ्यावर, पिंपळाचे झाड
एक वाढे दुसऱ्यावर, लई लई द्वाड ।।१।।
पिंपळ म्हणे धरेला, पडली कशी भूल
बीज नव्हतं रुजाया , दिली कशी हूल ।।२।।
वड मला सांभाळी, लांब लांब पारंब्यांनी
आनंदे मी वाजवी, टाळ्या लाख पानांनी ।।३।।
