STORYMIRROR

Sachin Mhetre

Tragedy Others

4  

Sachin Mhetre

Tragedy Others

आई

आई

1 min
451

झुंजूमुंजू झाले पक्षी उडाले गं आई 

'उठ बाळा' आज तुझी हाक कानी नाही ।।१।।


चोचीमध्ये पिल्लांच्या पक्षीण दाणे देई 

घास भरवण्या आम्हा आता कोठे शोधू आई ।।२।।


पंखात शिरण्या पिल्लांची किती झाली घाई 

भीरभीरकरती डोळे नजरेस सापडेना आई ।।३।।


पंख पसरुनी पक्षीण पिल्ले पंखाखाली घेई 

तुजवीन आता आम्ही झालो पोरके गं आई।।४।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy