STORYMIRROR

Sachin Mhetre

Romance

4  

Sachin Mhetre

Romance

श्रावण जलपरी

श्रावण जलपरी

1 min
268

सरसर झरझर ओल्या, ओल्या श्रावण सरी 

थुईथुई नाचे पाण्यावर, चिंबचिंब जलपरी ।।१।।


भाळावरुनी थेंब सरकती, सरसर गोऱ्या गाली 

केसांतुनी हे थेंब चमकती, मोती माला ल्याली ।।२।।


देखोनी स्फटिकी ओलेती, ऐशा कोमल प्रहरी 

पाऊससरी बेधुंद बरसती, वारा होई लहरी ।।३।।


ओल्या देही पिंगा घाली, वारा कृष्णापरी 

 हवेत उडतो पदर राधेचा, अवखळ वाऱ्यावरी ।।४।।


कुडी लाजली अन थबकली, ओली साजन दारी 

सजनाची ही राधिका, अन साजन श्रीहरी ।।५।।  


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance