पाऊल खुणा
पाऊल खुणा
लागली चाहूल, त्या इवल्या इवल्या पावलांच्या दौडण्यासाठी
काळजी पोटी कौतुक किती, सारं काही सांडण्यासाठी
थकवा सारा क्षमेल, रांगणं तूझ पाहण्याने
मोठेपणा तूझाच भासेल, सारं तूझ्या वागण्याने
तूझे बोबडे बोल आणी भावना, समजेल सारं काही
सोबत तूझ्या असताना, मग जगाचा विसर का पडणार नाही
तूच होशील जग, आणि तूच सारं आयुष्य
माझ्या आयुष्याचा बाण, अनं तूच माझा धनुष्य
छोटी छोटी स्वप्न माझी, तूझ्या सोबत पुर्ण करू
आनंदाने जगताना सोबत, आयुष्य सारे सारू
बघ तूझ्या स्वप्नांची होतेय, चाहूल पुन्हा पुन्हा
अलगद मला खुणावतायत, तूझ्याच पाऊल खुणा

