पाश बंधनाचे
पाश बंधनाचे
आयुष्याच्या हिंदोळ्यावर
तुझ्यासवे झुलावे वाटलं
सोडून सारे पाश बंधनाचे
मोहरुन फुलावे वाटलं...
सावरायला होता हात
अडखळून थोडं पडावं वाटलं
नकळत सुटला हात
थोडं धडपडल्यासारखे वाटलं...
तुझ्यासवे उन्हामध्ये सावली
मला व्हायचे होते
कासावीस मनाला
तहान तुझी बनायचे होते...
करून सारा आटा पिटा
स्वतःसाठी जगावं वाटलं
पुसल्या होत्या हातावरील रेषा
प्राक्तन माझे तुझ्याशी भेटलं..
वेडी आशा माझी
तुला रे कळली
अशी कशी रे आपली
मने जुळली...
ऐकण्या साद तुझी
मनाला रे भुरळ पडली
तुझ्या पावलाशी वाट
माझी रे घुटमळली....