STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

पापणीत मिटल्या

पापणीत मिटल्या

1 min
189

पापणीत मिटल्या माझ्या

सागराची गाज गर्जते

दिल्या घेतल्या वचनांची

आजही आठवण येते


स्वप्न सोनेरी जीवनाचे

हळव्या क्षणी तरळते

गोफ जीवनाचा रेशमी

बंधनात लज्जित होते


भेटीगाठी जीवाशिवाच्या

गुलकंदापरि प्रीतीच्या

पापणीत मिटल्या माझ्या

आजही सुगंधित ताज्या


अचानक ताटातुटीची

उभारली भिंत दैवाने

डाव उधळला प्रीतीचा

सरी अश्रूंच्या नशिबाने


पापणीत मिटल्या माझ्या

अजूनही सख्या येतोस

संकेत जगाचे तोडूनी

मज असेच भेटावेस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy