.. पापाचे प्रायश्चित...
.. पापाचे प्रायश्चित...
देतो मी तुझ्यावर केलेल्या
अत्याचाराची कबुली
खोट्या हव्यासापोटी
तुझी इज्जत लुटली...
त्या केलेल्या पापाचे प्रायश्चित
मला मिळणारच होते
माझा जीव घेण्यासाठी
तुझ्या आत्म्याची तळमळत होते...
हाय तुझी लागलीच
माझ्या जीवनाला
आलीस तू भूत बनून
माझा जीव न्यायला...
खूप मोठा गुन्हा मी
माझ्या आयुष्यात केला
मी ठरलो नराधम
स्वतःचाच वध मी केला...
