पाचोळा...
पाचोळा...
तू हलकीशी झुळूक होऊन वाऱ्याची..
येतेस अशी,
की तू गेल्यावर उठलेल्या भावनांच्या वादळाला
सावरताही येत नाही..
उडून जातो सर्व मनातला स्लेश
आणि उरतं फक्त प्रेम..
तर मग असं वादळ येऊ दे ना कितीही वेळा..
तू नसशील तर मग काय कामाचा..?
हा मनात साचलेला पाचोळा...

