STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

ऑनलाईन शिक्षण

ऑनलाईन शिक्षण

1 min
469

कोरोनाचा झाला असा कहर

आमच्या शाळा झाल्या बंद

लिहिणे नाही वाचणे नाही

शिक्षणाशी तुटला संबंध


काळजी लागली प्रत्येकांना

लहान मुलांच्या शिक्षणाची

अनेक उपाययोजना केल्या

भर ऑनलाईन शिक्षणाची


श्रीमंतांची लेकरं शिकू लागली

हातात टॅब मोबाईल घेऊन

गरिबांची लेकरं फिरू लागली

हातात शेणाची टोपली घेऊन


आजच्या ऑनलाईन शिक्षणाने 

वाढू लागली विषमतेची ही दरी

सर्वाना समान शिक्षण मिळेना

ज्ञानाचा दिवा पेटेना गरिबांच्या घरी


खेडेगावात मिळेना मोबाईलची रेंज

बोलणेच होत नाही कुठलं इंटरनेट

ऑनलाईन शिक्षणात गाडी रुतली

गरीबांचे शिक्षणाशी होत नाही भेट


गरीबांच्या लेकरांसाठी काही

ठोस उपाययोजना करायला हवे

सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना

शिक्षण मिळण्याची सोय व्हावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children