online बिनलाईन
online बिनलाईन
आजकालची प्रेमाची व्याख्याच,
like unlike...
sweetu, janu, oye..च्या बोलित,
मनाचा ठाव न ठिकाणा
जाणीवेचा अभाव न,
गरजे पुरता संबंध..
1 ते 2 आठवडे प्रेम सण,
मग ब्रेक अपचा सोहळा..
तसं अनोळखी तिही असते अन्,
तोही पण बोल ऐकायला आतुर..
सगळंच कसं डिजिटल भावनांचा खेळ
यांत्रिकी प्रेम..
online binline
नशीब याने दूरच्या
नात्यांना जवळ आणले..
मनाला व्यक्त व्हायला जमलं..
प्रेम मात्र हृदय असेल जीवंत तरच होते..
मनातून भाव जागे होतात..
online binline काही नाही
प्रेम प्रेम असतं व्यवहार नाही..

