STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Inspirational

4  

vaishali vartak

Abstract Inspirational

ओंजळ

ओंजळ

1 min
239

जोडुनिया दोन कर

होते ओंजळ हाताची

देण्या दान गरजुंना

भर भरूनी मानाची


बळ हवे मनगटी

नको दुजांची ओंजळ

कष्ट करता जीवनी

आयुष्यात येते बळ


आई घालते तांदूळ

दोन करांना जोडून 

ओटी भरते मुलीची

देते आशीष भरून


रिक्त कधीच नसावी

देवा जीवनी ओंजळ

होण्या संतुष्ट याचक

द्यावे दातृत्वाचे बळ


आपुल्याच ओंजळीत

भरा सुमने गंधित

अर्पू देवा गणेशास

मन होई आनंदित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract