ओंजळ
ओंजळ
ओंजळ माझी रिती
सुखाला यावी भरती
उचललेस तू धान्य मूठभर
पिकात कशी दाणे भरती...
ओंजळभर सुख माझे
देते आयुष्याला उभारी
एक मागणे देवा तुझला
ठेव सदैव माझा बाणा करारी...
ओंजळभर दुःख माझे
वाटे मला नभाहूनी
कर्तव्याच्या मार्गावर
टाकीन पावले मोठेपणी...
ओंजळ माझी भरलेली
मुक्तपणे सुमने उधळलेली
आयुष्याच्या वाटेवरती
थोडी अशी मी रुळलेली...
