ओळी षोडशाक्षरी
ओळी षोडशाक्षरी
पाहिलं पाठमोरं तू
असल्याचा भास झाला
परंतूू ती दुसरीच कोणी
होती न्यारी माला.
मी वाट तुझी बघता
दु:ख मनी दाटली
तु कधी भेटणार मज
सुमने ही सुकली
या एका चुकीची सजा
कां देतेस तू मजला
या प्रीतिचा अनोखा
नजराना दे ना मजला
प्रेम सागरात जणू
दवबींदू ही पडली
एका क्षणात बिलगूनी
ती एकजीव झाली.
अशीच तू जवळ घे
अलगद तू मजला
प्रीत फुलू दे अपुली
मखर हे माथ्याला.
सप्तपदीची शपथ
घेवूनीया मी आलो
अव्हेरू नको तू
ठेविन सुखात तूजला

