ओलावा आठवांचा.....
ओलावा आठवांचा.....
पावसाचा एक ढग ,
वारयासंगे आला वहात...
रंग होता तुझ्या केसांसारखा,
बसलो होतो मी पहात....
गार वारयाचा स्पर्श,
मला ही जाणवत होता..
तुझ्या आठवांचा पाऊस,
माझे डोळे पाणवत होता....
मग हळूहळू पावसाच्या,
बरसू लागल्या सरी...
असे वाटले फुलांचा वर्षाव,
झालाय माझ्यावरी...

