ओढ पावसाची
ओढ पावसाची


ओढ पावसाची
मनास छंद लावी
तुज भेटीची हुरहूर,
बैचेनी हृदयी व्हावी (१)
आता चालणे सोबत
नुकतेच सुरु झाले
अजूनही अडखळती
ते शब्द पावलात बापुडे (२)
ओघळती गालावरती
अन् बटांस लटकती मोती
किती छान दिसतेस तू
अन् लाज ओठ चावती (३)
शृृृंगार या मनाचा
इश्क परमोच्च शिखरावर
आता नाही उसंत
प्रणय या मेघसरींबरोबर (४)
उधळून टाक तुझे
हृदयातले भाव अनावर
बघ आला पाऊस
ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर (५)